Nana Patole : भाजपने अशोक चव्हाणांना दिलेल्या ऑफरवर पटोलेंची प्रतिक्रिया! म्हणाले, "सत्तेचे लालची..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole : भाजपने अशोक चव्हाणांना दिलेल्या ऑफरवर पटोलेंची प्रतिक्रिया! म्हणाले, "सत्तेचे लालची..."

Nana Patole : भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. अशोक चव्हाण सक्षम नेते आहेत त्यांनी भाजपात येण्याचा विचार करावा, असे विखे पाटील म्हणाले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. 

नाना पटोले म्हणाले, विखे पाटील फक्त सत्तेचे लालची आहेत. ज्या काँग्रेसने यांना मोठं केल तेच म्हणतात काँग्रेसमध्ये काही राहीलं नाही. विखे फक्त सत्तेसाठी आहेत. उद्या काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा विखे काँग्रेसमध्ये येतील का?, असा प्रश्न पद्धतीचा ते प्रश्न उपस्थित करत आहेत. 

काय म्हणाले होते विखे पाटील ?

अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी आता विचार करायला हवा, अशी ऑफर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे पाटील म्हणाले, ज्या पक्षात अशोक चव्हाण आहेत. त्या काँग्रेस पक्षाचे भविष्य काय आहे?. नाशिक पदवीधरमध्ये व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली. यामध्ये पक्षाचा कुठे विचार झाला. अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केले आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण यांची मोठी परंपरा आहे. 

विश्वनेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने स्विकारले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याचा विचार अशोक चव्हाण यांनी करावा, असे विखे पाटील म्हणाले.