सांगलीत निवड स्वीकृत नगरसेवकाची; हस्तक्षेप थेट नाना पटोलेंचा

 नाना पटोले
नाना पटोलेGoogle

सांगली : कोणे एकेकाळी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यावर असे काही वर्चस्व होते की सहकारी संस्था असोत की स्थानिक स्वराज्य संस्था झाडून काँग्रेसच्या ताब्यात असायच्या. काँग्रेसच्या त्या सुवर्णकाळात इथले नेतेच राज्याचे राजकारण बघायचे. त्यामुळे सांगलीत (Sangli)एखादी निवड व्हायची असेल तर नेत्यांचा शब्द पुरेसा असायचा. मात्र, दिवस फिरले आणि आता स्वीकृत नगरसेवकाची वर्षभरासाठी निवड करण्यासाठीही इथल्या नेत्यांना थेट प्रदेशाध्यक्षांची चिठ्ठी आणावी लागली. यातून स्थानिक काँग्रेस नेत्यांनी योग्य तो बोध घेतलेला बरा.

करीम मेस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागी राजेश नाईक यांची निवड करण्याचा निर्णय पलूस येथे काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत झाला होता. यावेळी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, नेत्या जयश्री मदन पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल प्रकाशबापू पाटील अशी मात्तबर नेते मंडळी होती. या निवडीत नाईक यांचे नाव निश्‍चित झाले. मात्र हे नाव जाहीर करण्यात नेत्यांनी थोडी घाईच केली. कारण त्यानंतर काँग्रेसमध्ये महापालिकेत तरी एकमुखी नेतेपद कोणाकडे नाही. त्यामुळे या नेत्यांनी जाहीर केलेल्या नावावर दुमत होणार हे निश्‍चित होते. तसेच झाले.

 नाना पटोले
भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचे टिकास्त्र

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली होती. कदम यांचे खंदे समर्थक मयूर पाटील यांचे नाव अचानकपणे पुढे आले आहे. दरम्यान, नाईक यांच्या नावाचा प्रस्ताव छाननीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाटील यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची शिफारस आणली. त्यामुळे बुधवारी पाटील यांच्या नावाचा प्रस्तावही प्रशासनाकडे छाननीसाठी सादर करण्यात आला होता. छाननीत नाईक व पाटील यांचे अर्ज पात्र ठरले . त्यानंतर पटोलेंच्या हस्तक्षेपानंतर नाईक यांच्याऐवजी मयूर पाटील यांचे नाव पुढे आले. त्यानुसार उद्याच्या महासभेत मयूर पाटील यांची निवड होईल.

सभागृहात काँग्रेसला आवाज मिळवून देण्यासाठी अनुभवी कार्यकर्ते राजेश नाईक यांचे नाव पुढे आले होते. मात्र गटांतर्गत सत्तावाटपाचा मुद्दा पुढे आल्यानंतर नाईक यांचे नाव मागे पडले. नाईक किंवा पाटील यांची निवड वर्ष दीड वर्षासाठीच मात्र, यानिमित्ताने काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणालाच खतपाणी मिळाले. आता एक प्रश्‍न कळीचा ठरतो तो म्हणजे खरेच या पदासाठी नेत्यांना एकमुखाने का निर्णय करता आला नाही. नेते एवढ्या एका मुद्यावर एकमत करू शकत नसतील तर ते राष्ट्रवादी किंवा भाजपविरोधात एकजुटीने कसे लढणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com