LokSabha 2019 : नाना पटोले नागपुरमधून, सुशीलकुमार सोलापुर तर प्रिया दत्त मुंबई उत्तर मधून

LokSabha 2019 : नाना पटोले नागपुरमधून, सुशीलकुमार सोलापुर तर प्रिया दत्त मुंबई उत्तर मधून

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते नागपूरमधून नाना पटोले आणि सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांचे. 

काँग्रेसने नुकतीच पहिली यादी जाहीर केली होती, त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचा समावेश होता. आता दुसरी यादी जाहीर करताना काँग्रेसने उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात मोरादाबादमधून राज बब्बर यांना, तर सुल्तानपूरमधून संजयसिंह यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रात नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले ही मोठी लढत पहायला मिळणार आहे. तर, सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी दिली आहे. निवडणूक लढण्यास नकार देणाऱ्या प्रिया दत्त यांची राहुल गांधींनी समजूत काढल्यानंतर त्यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून आणि मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून संधी दिली आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच नावे. 

नागपूर- नाना पटोले 
गडचिरोली- नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर- प्रिया दत्त 

मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा 

सोलापूर- सुशीलकुमार शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com