पर्यटन मंत्र्यांचा दौरा निव्वळ पर्यटनासाठीच; नितेश राणेंचा टोला

जिथे वाद नसेल तिथे लवकरच ग्रीन रिफायनरी-नितेश राणे
Nitesh Rane , Aaditya Thackeray
Nitesh Rane , Aaditya ThackerayEsakal

कणकवली : नाणार (Nanar) वगळता इतर सर्व गावांतून रिफायनरी प्रकल्‍पाला वाढता पाठींबा मिळतोय. त्‍यामुळे लवकरच ग्रीन रिफायनरी प्रकल्‍प आम्‍ही केंद्राच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू असा विश्‍वास आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज व्यक्‍त केला.

बजेटमध्ये कोणतीही तरतूद नसलेल्‍या योजना इथे येऊन जाहीर करतात. आम्‍ही सुरू केलेल्‍या विकास कामांची उद्‌घाटन करतात. तसेच दोन वर्षे कोरोना काळात होरपळलेल्या पर्यटन व्यवसायिकांशी ते संवाद साधत नसतील तर पर्यटन मंत्र्यांचा दौरा हा निव्वळ पर्यटनासाठीच होता अशीही टीका राणे यांनी केली.

येथील प्रहार भवन येथे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, जनमताच्या रेट्यामुळे अखेर शिवसेनेलाही रिफायनरी प्रकल्‍पाला पाठिंबा द्यावा लागला. आता राज्‍य शासनाने लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्‍पासाठीची जागा केंद्राकडे दयावी. या प्रकल्‍पाबाबत आम्‍ही प्रमोद जठार (Pramod Jathar) यांच्या नेतृत्‍वाखाली तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार आहोत.

मनात आणलं तर देवगड नगराध्यक्ष बदलू शकतो

देवगडचा नगराध्यक्ष ठेवायचा की बदलायचा हे माझ्या मुडवर आहे. मनात आणलं तर मी देवगडचा नगराध्यक्ष बदलू शकतो. तेथील बहुतांश लोक माझ्या संपर्कात आहेत. मला मैदानाबाहेर ठेवून महाविकास आघाडीने नगरपंचायत जिंकली आहे. मी मैदानात असतो तर देवगड आमच्या ताब्‍यात आणली असती. पण आजही मी देवगडचा नगराध्यक्ष बदलू शकतो हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असा इशाराही राणे यांनी दिला.

आवाज वाढला पण वाघाचा की मांजरीचा

पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्‍याचे वक्तव्य केले होते. पण हा वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला आमदार नीतेश राणे यांनी आज लगावला. तसेच नुसते दौरे करून काहीही उपयोग नाही, तुम्‍ही जिल्‍हावासीयांसाठी किती निधी आणला. पर्यटन व्यावसायिकांसाठी काय पॅकेज तयार केलं याची माहिती आधी द्या असेही ते म्‍हणाले.

सिंधुरत्‍नसाठी बजेटमध्ये तरतूद का नाही

सिंधुरत्‍न योजना आम्‍ही दोन वर्षे ऐकतोय. पण या योजनेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद झालेली नाही. तरीही या योजनेचे लोकार्पण करण्यामागे नेमकं राजकारण काय असा प्रश्‍न श्री.राणे यांनी उपस्थित केला. चांदा ते बांदा या योजनेतील सगळा पैसा सावंतवाडीत मतदारसंघात खर्च करण्यात आला. उर्वरीत मतदारसंघावर अन्यायच झाला. त्‍यामुळे या योजना एका व्यक्‍तीसाठी, शिवसेनेसाठी की जनतेसाठी आहेत याचंही उत्तर ठाकरेंनी द्यायला हवं असे राणे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com