esakal | नांदेड पोटनिवडणूक: सुभाष साबणे शिवबंधन मोडून भाजपाची उमेदवारी घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड पोटनिवडणूक: सुभाष साबणे शिवबंधन मोडून भाजपाची उमेदवारी घेणार?

नांदेड पोटनिवडणूक: सुभाष साबणे शिवबंधन मोडून भाजपाची उमेदवारी घेणार?

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: देशभरात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका (Bypoll) होणार आहेत. महाराष्ट्रात नांदेडमधील (nanded) देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Deglur-Biloli bypoll) होणार आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांच्या निधनांनंतर ही जागा रिक्त झाली होती. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले होते. रावसाहेब यांचा मुलगा जितेश अंतपुरकर याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या आज होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून भाजपा सुभाष साबणे यांना उमेदवारी देऊ शकते. त्यासाठी सुभाष साबणे यांना शिवसेनेची साथ सोडावी लागेल. सुभाष साबणे हे माजी आमदार असून अंतपुरकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आहे.

हेही वाचा: परमबीर सिंग रशियामध्ये आहेत का?

मुंबईत याबाबत भाजपची काल बैठक झाली आहे. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार सुभाष साबणे याना संधी मिळू शकते. सुभाष साबणे शिवसेनेची साथ सोडून भाजपकडून उमेदवारी घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.

loading image
go to top