Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Mitali Sethi : आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये त्यांनी दाखल करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान मुलांना शाळेत सोडायला जातानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nandurbar District Collector Dr. Mitali Sethi enrolling her twin children, Sabar and Shukar, at Tokartalav Anganwadi, setting an example by choosing government education over private schools.

Nandurbar District Collector Dr. Mitali Sethi enrolling her twin children, Sabar and Shukar, at Tokartalav Anganwadi, setting an example by choosing government education over private schools.

esakal

Updated on

Summary

  1. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीत प्रवेश दिला.

  2. त्यांच्या या निर्णयामुळे शासकीय शाळांबाबत समाजात विश्वास निर्माण करण्याचा संदेश दिला.

  3. या आदर्श कृतीचे राज्यभरात कौतुक होत असून इतर पालकांसाठी हे प्रेरणादायी ठरले.

आजकाल बहुतेक पालक आपल्या मुलांचा इंग्रजी माध्यमांच्या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होताना होताना दिसत आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत केला आहे. त्यांच्या आदर्श कृतीचे कौतूक सर्वत्र होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com