
पावसामुळे आता नद्या, ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागात मुसळधार पावसामुळे नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प होते. तर काही गावांचा संपर्क तुटतो. नंदूरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे ओढे-नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. यामुळे पाड्यांवर राहणाऱ्यांना जीव धोक्यात घालून नद्या, ओढे ओलांडावे लागत आहेत. यात विद्यार्थीसुद्धा शाळेसाठी जीव धोक्यात घालत आहेत.