Narayan Rane: नारायण राणेंनी आधीच सांगितला एक्झिट पोल, म्हणाले, 'कार्यकर्त्यांनी...'

Narayan Rane: ४ जूनला देशभरातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी मोठा दावा केला आहे.
Narayan Rane
Narayan RaneEsakal

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll) हे काही वेळातच समोर येण्यात सुरूवात होणार आहेत. तर ४ जूनला देशभरातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी मोठा दावा केला आहे. माझा विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

आपल्याला उद्याच्या निकालाची धाकधुक नाही. आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी विजयाच्या रॅलीची तयारी सुरू केली आहे, असंही ते म्हणालेत.

Narayan Rane
Congress: ​चोवीस तासाच्या आत काँग्रेसचा यु-टर्न; INDIA आघाडीच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय

मी विजयी होणार आहे.कोणत्याही निवडणुकीत जेव्हा आपण जातो. तेव्हा तुम्ही जिंकणार असं नाही. पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि ज्या प्रकरचा प्रतिसाद लोकांनी दिला. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षांने किंवा RSSच्या कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलं त्यामुळे माझं यश १०० टक्के आहे.

Narayan Rane
PM Face of INDIA Bloc: इंडिया आघाडीची सत्ता आल्यास कोण असेल पंतप्रधानपदाचा चेहरा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com