PM Face of INDIA Bloc: इंडिया आघाडीची सत्ता आल्यास कोण असेल पंतप्रधानपदाचा चेहरा?

इंडिया आघाडीची देशात सत्ता येईल अन् निकालानंतर ४८ तासांच्या आतमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड होईल, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतंच केलं आहे.
India Alliance
India Allianceesakal

नवी दिल्ली : इंडिया आघाडीची देशात सत्ता येईल आणि निकालानंतर ४८ तासांच्या आतमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड होईल, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतंच केलं आहे. त्यामुळं आता खरंच इंडिया आघाडीची सत्ता आली तर त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नेमका कोण असेल? याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिल. (Who will be PM Face of INDIA Bloc if the oppositions comes to power)

India Alliance
Chandra Kumar Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूनं बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले, धर्मनिरपेक्षतेला...

काय म्हणाले होते जयराम रमेश?

राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार तेलंगाणा या राज्यांमध्ये जिथं २०१९ मध्ये आमचा सुफडासाफ झाला होता त्या ठिकाणी यंदा आमची कामगिरी खूपच चांगली असेल. राजस्थानात काँग्रेसची कामगिरी चांगली राहिलं. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये युतीमध्ये आमची कामगिरी चांगली राहिल, असं जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

India Alliance
Gold Price 2024: सोन्यात गुंतवणूक करणारे या वर्षी होऊ शकतात मालामाल; काय आहे कारण?

इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण असेल?

लोकसभा निवडणुकीचा ४ जूनला निकाल जाहीर झाल्यानतंर जर इंडिया आघाडीला बहुमत मिळालं आणि त्यांची सत्ता स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब झालं तर पंतप्रधान कोण होईल? यासाठी पाच नाव सर्वाधिक चर्चेत आहेत.

India Alliance
Ravi Kishan: "मोदींच्या ध्यानधारणेमुळे सूर्यदेव शांत झाले, कडक उन्हात वारे वाहू लागले"; रवी किशन नेमकं काय म्हणाले?

'हे' असतील संभाव्य पाच उमेदवार?

१) राहुल गांधी : यांपैकी काँग्रेसची पहिली पसंती राहुल गांधी हे आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या नावावर एकमत आहे पण इंडिया आघाडीत हे एकमत होईल का? त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.

२) मल्लिकार्जुन खर्गे : त्यानंतर पंतप्रधानपदासाठी दुसरं नाव हे काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचं आहे.

३) ममता बॅनर्जी : तसंच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीचा तिसरा चेहरा आहे, ममता बॅनर्जी यांचा. तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीत समाविष्ट नाही, पण आपला आघाडीला बाहेरुन पाठिंबा असेल असं नुकतंच त्यांनी जाहीर केलं आहे.

४) अर्थशास्त्रज्ञ : त्यानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चौथा चेहरा हा एखादा अर्थशास्त्रज्ञ असू शकेल. कारण २००४ मध्ये ज्याप्रमाणं युपीएची सत्ता आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव समोर आलं होतं त्याप्रमाणं एखादा वेगळाच चेहरा पुढे येऊ शकतो.

५) शरद पवार : तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचंही नाव पुढे येऊ शकतं. पण त्यांनी यापूर्वीच या प्रश्नांवर आपला पंतप्रधान होण्याचा कुठलाही मानस नसल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर सध्या त्यांची प्रकृती तशी ठणठणीत असली तरी त्यांचं वय वर्षे ८४ असल्यानं याबाबत किती एकमत होऊ शकतं, हे पाहावं लागणार आहे. जर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर पहिला मराठी माणूस हा पंतप्रधान होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com