Narayan Rane: 'त्यांच्याबद्दल विचारताच कशाला? ती संपलेली माणसं'! राणे कुणाविषयी बोलले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane Case

Narayan Rane: 'त्यांच्याबद्दल विचारताच कशाला? ती संपलेली माणसं'! राणे कुणाविषयी बोलले?

Narayan Rane BJP Leader comment : राज्याच्या राजकारणातील वारे आता वेगळे वाहू लागले आहेत. गेल्या एक दोन दिवसांपासून पुन्हा बंडाच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आमच्याकडे किती आणि कोणते आमदार येणार याविषयी हिशोब करत आहे, अशावेळी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलेली टिप्पणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राणेंना पत्रकारांनाच फटकारले आहे.

राज्याच्या राजकारणात सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. होणारी वेगवेगळी राजकीय वक्तव्य यामुळे अनेकांना भांबावून गेल्यासारखे झाले आहे. नारायण राणे हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे नेते आहे. आपल्या वक्तव्यानं खळबळ उडवून देण्यासाठी राणे यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी खैरेंवर देखील आपल्या नेहमीच्या शैलीत एक जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे येत्या काळात राणे आणि खैरे यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे नेते नारायण राणे यांचा पुन्हा एकदा संताप पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. त्यात त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे.ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खैरे यांनी औरंगाबादमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक टिप्पणी केली होती. त्यावरुन राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: Narayan Rane: सिंधुदूर्गातील बैठकीत राणे-राऊतांमध्ये जुंपली!

खैरे यांनी फडणवीस यांच्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि त्यावरुन राणे यांना विचारला असता त्यांनी खैरे यांना राजकारणातील सगळ्यात जास्त माहिती आहे. मला त्यांच्याबद्दल काहीही विचारु नका. तुम्ही ज्यांच्याविषयी मला विचारता आहात ते संपलेली माणसं आहेत. खैरे यांनी औरंगाबाद शहरामधील वरणगावात फडणवीस यांच्यावर टिप्पणी केली होती. खैरे हे आता रिटायर झाले आहेत. त्यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे. आणि तसंही त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे ....अशा शब्दांत राणे यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: Narayan Rane: चारआण्यावरील नारायण राणेंचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर राडा

काही दिवसांपूर्वी राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राउत यांच्यात खडाजंगी झाली होती. त्याची चर्चा सोशल मीडियावर बराच काळ रंगली होती. नेटकऱ्यांनी देखील त्यावरुन राणे यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.