Narayan Rane: सिंधुदूर्गातील बैठकीत राणे-राऊतांमध्ये जुंपली!

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातील तो वाद अनेकांसाठी धक्कादायक होता.
Narayan Rane
Narayan Raneesakal

Narayan Rane Bjp Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांची काही वक्तव्यं ही राजकीय वर्तुळात चर्चिली गेली आहेत. विशेषत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केलेली टीका नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. आता राणे ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यात झालेल्या तू तू मैं मैं चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपूत्र निलेश आणि नितेश राणे यांची सोशल मीडियावर चर्चा होत असते. विरोधी पक्षांवर आणि नेत्यांवर हल्लाबोल करणे आणि राजकीय वर्तुळात विविध वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणे यामुळे राणे कुटूंब खास आकर्षणाचा विषय राहिले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये राणे आणि राऊत यांच्याती वाकयुद्धाचा प्रत्यय कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे नेमकं सरकारमध्ये कोण, आणि निर्णय घेणारे कोण असा प्रश्न नेटकरी, नागरिकांना पडला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जे झालं ते आता व्हायरल झालं आहे.

Narayan Rane
Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातील तो वाद अनेकांसाठी धक्कादायक होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे राऊतांमध्ये झालेल्या खडाजंगींनं काही काळ बैठकीमध्ये तणावही निर्माण झाला होता. जेव्हापासून शिंदे सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून वेगळ्याच प्रकारचे राजकीय वातावरण दिसून येत आहे. याचा प्रत्यय नागरिकांनी, नेटकऱ्यांनी घेतला आहे. दसरा मेळाव्याच्या वेळी देखील हे दिसून आले होते.

Narayan Rane
Double XL Movie: 'कपिल कोणत्या आंटीसोबत लग्न करतोय'! पत्नीनचं केला खुलासा

राणे आणि राऊत यांच्यातील वाद टोकाला गेला होता. याप्रसंगी बैठक कोण चालवत आहे? अशी विचारणा विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना करावी लागली होती. सभेच्या नियम आणि समोर आलेल्या अजेंड्यानुसार बैठक चालावी असं राणे यांचं म्हणणं होतं.

Narayan Rane
Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com