नारायण राणेंची विश्वासार्हता पणाला 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई - कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेतल्याचे वृत्त झळकल्याने त्यांची विश्वासार्हता पणाला लागल्याची चर्चा सुरू आहे. 

राणे यांची शहा यांच्यासोबत भेट झाल्याच्या चर्चेनंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. कॉंग्रेसने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नसताना राणेंना पक्षात घेण्यासाठी उत्सुक नसलेल्या भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे किमान सध्या तरी राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. 

राणे आणि शहा यांची भेट गुप्त होती; पण ही गुप्त भेट सार्वजनिक झाल्याने राणेंची पंचायत झाली, तर भाजपत गोंधळ सुरू आहे. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होणार नसल्याची शक्‍यता आहे. 

सुरवातीला राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता; पण गुप्त भेटीची बातमी फुटल्याने त्यांच्या पक्षप्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. खासगी कामासाठी अहमदाबादला गेल्याचा दावा करणाऱ्या राणेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

गेल्या तीन-चार दिवसांतील या घडामोडीमुळे राणे कमालीचे अस्वस्थ आहेत. 
कॉंग्रेसने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने पक्षातून त्यांच्याकडे संशयातून बघितले जात आहे. पक्षांतर्गत त्यांचे विरोधक खूष असून या घटनेमुळे दिल्लीतही राणे यांचे वजन कमी झाल्याची कॉंग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप प्रवेश लांबल्याने राणे यांची कॉंग्रेसमध्ये कोंडी झाल्याचे मानण्यात येते. 

राणेंच्या अडचणीत वाढ? 
भाजपकडून पक्षप्रवेश लांबल्यामुळे राणेंची बरीच अडचण झाल्याची चर्चा आहे. राणेंची अहमदाबादमधील भेट उघड झाल्याने कॉंग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कालपासून सुरू झालेल्या संघर्षयात्रेतही ते सहभागी झाले नव्हते, तर दुसरीकडे भाजपमध्ये त्यांच्याविरोधात दबाब गट तयार झाला आहे. त्यामुळे आता राणे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Narayan rane credibility discussion