'सेना नेत्यांनी कुणाचे पैसे कुठं गुंतवलेत हे माझ्याइतकं कुणालाच माहित नाही'

ज्या शिवसैनिकांचे संसार उघडे पडलेत मुख्यमंत्री गेले का त्यांच्या घरी? - नारायण राणे
Narayan-Rane
Narayan-Raneesakal
Summary

ज्या शिवसैनिकांचे संसार उघडे पडलेत मुख्यमंत्री गेले का त्यांच्या घरी? - नारायण राणे

तुम्ही किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखा असल्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या घरावर ईडीने जप्ती आणली असून अजूनही बरंच काही आहे. तुमच्यातील ठराविक लोकांचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे आहेत. शिवसैनिकांना त्यातली कवडी तरी दिली का?, असा सवाल संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी प्राण गमावले, त्यांचे संसार उघडे पडलेत मुख्यमंत्री गेले का त्यांच्या घरी? शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाचे पैसे, कुठे गुंतवलेत हे माझ्याइतके कुणालाच माहित नाही. अगदी किरीट सोमय्यांनाही नाही, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. आज मुंबईत ते बोलत होते.

Narayan-Rane
पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा - निलेश राणे

यावेळी ते म्हणाले, भाजपची देशात सत्ता आहे. ३०२ खासदार असून अनेक राज्यातही सत्ता आहे. त्यामुळ सत्ताधाऱ्यांची समोर येऊन नजर भिडवायची ताकद नाही. ज्या अर्थी आमदार नाही, खासदार नाही त्या अर्थी एकाकी पडणार आहात हे लक्षात घ्या, असा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. संजय राऊत काल परवा शिवेसेनेत आले आहेत. त्यांना काय कळत यातंल. आधी ते कपडे उतरवायची भाषा करत होते आता आदेश द्यायला लागलेत. पक्ष प्रमुख कोण आहेत, उद्धव ठाकरे की संजय राऊत असा सवालही राणे यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ करण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य केलं होते. यावर पलटवार करताना राणे म्हणाले, राऊतांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचं वेगळं पिल्लु सोडलं आहे. १९९२-९३ च्या दंगलीत अनिल परब यांनी मार खाल्ला होता. आता मार खाल्ला तर वसुली करत आहेत. १९९२-९३ ला हे लपून बसलेले मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर आलेले नाहीत. शिवसेनेच्या जन्मापासून आक्रमक असलेले असंख्य आहेत. पण आता कुणी विचारत नाही. घरच्या स्त्रियांबद्दल मी काही बोलणार नाही. पण काय चाललं आहे ठाकरे सरकारमध्ये राज्य लोकांसाठी चालवायचं असतं, घरच्यांसाठी चालवायचं नाही. आमच्या नातेवाईकांवर सुडाने कारवाई असं म्हणतात. नातेवाईक गुणी आहेत का, त्यांना देवळात जाताना पकडलं का?, असंही ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, ठाकरे सरकार जनमाणसांच्या मनातून संपत चालले आहे. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस हे एकटे नाहीत. देशात नव्हे तर जगात सर्वाधिक खासदार, आमदार लोकप्रतिनीधी असलेला भाजप पक्ष आहे. तुमचे आकडे सांगा, मोदींच्या कृपेने १८ आले, पुढच्यावेळी ८ आणून दाखवा, असंही खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे.

Narayan-Rane
काल जल्लोष करणारे आंदोलनकर्ते एसटी कर्मचारी आज आक्रमक का बनले ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com