दसऱ्याच्या आधीच राणेंचे सीमोल्लंघन? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले. परंतु त्याची निश्‍चित तारीख आज सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी केआरए आणि एक प्रश्‍नावली तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिल्यानंतर कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनीही दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन करणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने राज्यात लवकरच राजकीय घडामोंडींना वेग येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचा समावेश होण्याची शक्‍यता वर्तवितानाच मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले. परंतु त्याची निश्‍चित तारीख आज सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी केआरए आणि एक प्रश्‍नावली तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन करणार असल्याची घोषणा नारायण राणे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने राणे यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येते. या वेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 

अशोक चव्हाण कॉंग्रेस संपवत आहेत. सिंधुदुर्गातील कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेताना आपल्याला विचारण्यात आले नाही. कॉंग्रेस संपवणाऱ्यांनाच आपण संपवू असे सांगून अजूनही आपण कॉंग्रेसमध्येच असून नवरात्रीमध्ये भूमिका स्पष्ट करू, असे राणे म्हणाले. दरम्यान, राणेंच्या वक्‍तव्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी यावर "नो कमेंट्‌स' अशी प्रतिक्रिया दिली. 
................ ............. ............. 
 
Web Title: Narayan Rane entry in BJP