आंबा बागायतदारांना नारायण राणे यांचा शब्द, म्हणाले

narayan rane
narayan ranesakal
Updated on

रत्नागिरी : बागायतदारांना सरकारी मोबदला कसा देता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आंबा बागायतदारांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. याची काळजी मी घेणार आहे. यावर चर्चा करून नक्कीच पुढची दिशा ठरवणार, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत जनसंवाद यात्रे दरम्यान केले.

पुढे ते म्हणाले, कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत आहेत. पण तुम्हाला शब्द तो की तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावणार. तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊन देणार नाही, असा शब्द नारायण राणे यांनी दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करण ही टाळलं.

Summary

आंबा बागायतदारांवर आत्महत्येची वेळ येऊन देणार नाही, असा शब्द नारायण राणे यांनी दिला.

ते म्हणाले, मी आशीर्वाद घेण्यासाठी रत्नागिरीत आलो आहे. तेव्हा आंबा बागायातदार भेटु इच्छीत आहेत,असे मला सांगण्यात आले. त्यांची भेट घेतली त्यांच्या समस्याबाबत त्यांनी माहिती दिली. मी एवढेच सांगिन की, तुमचे निवेदन मिळाले आहेत. याचा अभ्यास करून बागायतदारांना सरकारकडून कसा मोबदला मिळावा आणि मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. त्यापैकी एक बागायतदार म्हणाला, नाहीतर आम्हाला आत्महत्या करावी लागल. पण मी तुम्हाला शब्द देतो की ही वेळ मी येऊन देणार नाही.

narayan rane
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु

देशाचा कॅबिनेट मंत्री असलो तरी कोणातून गेलो आहे. हा सामाईक प्रश्न मी सोडविण्याचा नक्की प्रयत्न करणे. आंबा बागायतदारांच्या कर्जाचे पुनर्रगठण करण्यात आले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना पुन्हा कसे आर्थिकदृष्ट्या उभा करता येईल, यादृष्टीने माझा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मंत्रीपद देताना, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रीपद दिले. यामध्ये फुड प्रोसेसिंग एक विभाग आहे. अधिकाऱ्याला घेऊन बागायदारांना कसा दिलासा देता येईल आणि तुमचे प्रश्न कसे सोडविता येतील यासाठी माझा प्रयत्न राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com