Vidhan Sabha 2019 : राणेंचंही ठरलं;  'या' तारखेला होणार भाजपप्रवेश

टीम ई-सकाळ
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असतानाच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुबंईमध्ये भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येत्या 20 सप्टेंबरला नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आहे. नारायण राणे यांच्याशी संपर्क केला असता, पक्षप्रवेशाबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीती आहे. 20 तारीख अद्याप निश्चित नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

शिवसेनेचं आरेला कारे तर भाजपचा नाणार येणारचा नारा

दरम्यान, माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्णपणे विश्वास असून भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले होते. तसेच, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कणकवली विधानसभेची जागा निलेश राणे यांनाच मिळेल असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane may Enters in BJP on 20 September