
"मला मारण्याची सुपारी दिली अन् लगेच म्हणाले उद्धव कुणाला लाफा तरी मारू शकतात का?"
मुंबई - राज्यात अनेक धक्कादायक घडामोडीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून सातत्याने बंडखोरांवर टीका करत आहेत. त्यातच उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत देऊन पुन्हा टीका केली. त्याला आज भाजपनेते आणि पुर्वाश्रमीचे नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा: मुख्यमंत्रीपदासाठी नारायण राणेंचं नाव सुचवणाऱ्या स्मिता ठाकरे कोण?
उद्धव ठाकरे सातत्याने बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत आहेत. मात्र बंडखोर गटाकडून त्यांना प्रत्युत्तर देणं टाळण्यात येत होतं. मात्र आज राणे यांनी शिंदे गटाची बाजू खंबीर करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी राणे यांनी मातोश्रीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना तुम्ही एकनाथ शिंदेंवर हात उचलू शकता का ? अस आव्हान राणे यांनी दिलं. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. सरकार गेलं, मुख्यमंत्रीपद गेलं, आणि तुम्ही मुलाखत घेता. संजय राऊत यांच्याविषयी अपशब्द बोलत तुम्हीच त्यांचं मुख्यमंत्री घालवल्याचं राणे यांनी म्हटलं.
हेही वाचा: स्मिता ठाकरे पोहोचल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव यांनी शिवसैनिकांना कधी मदत केली का ? किती मराठी माणसांना नोकऱ्या लावल्या ? किती तरुणांना मदत केली, असे सवाल राणे यांनी केले. त्याचवेळी हे उद्धव ठाकरे कधी कोणाला चापट तरी मारू शकतात, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. त्याचवेळी मी शिवसेना सोडल्यानंतर मला मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा गौप्यस्फोटही केला.
राणे यांनी उद्धव यांच्याकडून काही होत नाही, अस म्हणतांनाच त्यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा दावाही केला. त्यामुळे राणे उद्धव ठाकरे यांना नेमक काय म्हणू इच्छित होते, हे कळणं कठिण झालं.
Web Title: Narayan Rane On Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..