
नागपूर: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतून मराठी माणूस कुठे गेला आणि त्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष आता अशा अवस्थेत का आला, याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे राणे म्हणाले.
''उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही''
राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी नेमके काय केले? आता मराठी भाषेवरून आनंदोत्सव साजरा करत आहेत. उद्धव ठाकरेंना मराठीवर आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही." मराठी तरुणांसाठी उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही, असं म्हणत राणेंनी जोरदार टीकास्र सोडलं.