
Sakal Saam Survey: मोदींना फाईट कोण देणार ? राहुल गांधी की केजरीवाल, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल या नेत्याच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केंद्रातील 9 वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्षांत सरकारने असे अनेक टप्पे गाठले आहेत. हे निर्णय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसाठी गेम चेंजर ठरले. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत गेली. या निर्णयांमुळे लोकांमध्ये भाजपचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास वाढला. अशा परिस्थितीत दोन टर्मनंतर पंतप्रधान मोदींसमोर 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हॅटट्रिक करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.(Latest Marathi News)
या 9 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये मोदी सरकार आणि त्यांच्या निर्णयाबद्दलचे प्रश्न महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील मतदारांकडून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.(Latest Marathi News)
सकाळच्या दोन हजारांवर सहकाऱ्यांनी हे सर्वेक्षण केले आहे, एकुण ४९२३१ लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सर्वेक्षण केले आहे. मतदारांचा कल समजून घेण्याचा सकाळने प्रयत्न केला आहे.
'सकाळ'ने केलेल्या या सर्वेक्षणात 'विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी, नितीश कुमार, एम के स्टॅलिन,अरविंद केजरीवाल,के चंद्रशेखर राव (केसीआर), यापैकी एकही नाही, आणि सांगता येत नाही हे पर्याय देण्यात आले होते.(Latest Marathi News)
या प्रश्नावर मतदारांनी दिलेला कल
ममता बॅनर्जी: 4.5% ; राहुल गांधी: 34.9% ; नितीश कुमार: 4.1% ; एम के स्टॅलिन: 1.8% ; अरविंद केजरीवाल: 12% ; के चंद्रशेखर राव (केसीआर): 2.9% ; यापैकी एकही नाही: 23.2%;सांगता येत नाही: 16.7%
या प्रश्नावर मतदारांनी दिलेला कल पाहता विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती ही राहुल गांधी यांना देण्यात आली आहे.
तर याच सर्वेक्षणातील दूसरा प्रश्न होता की, 'विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांपैकी कोणत्या आरोपात आपल्याला तथ्य वाटते?'(Latest Marathi News)
या प्रश्नासाठी नोटबंदी फसली, धार्मिक तेढ वाढली, जातीय तणाव, ठराविक उद्योजकांना लाभ, बेरोजगारी वाढली, अर्थव्यवस्था अडचणीत, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव, संविधानिक मूल्यांची पायमल्ली, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी एकही नाही असे पर्याय देण्यात आले होते.
या प्रश्नावर मतदारांनी दिलेला कल
नोटबंदी फसली: 15%
धार्मिक तेढ वाढली: 9.7%
जातीय तणाव: 5%
ठराविक उद्योजकांना लाभ: 6.6 %
बेरोजगारी वाढली: 14,2%
अर्थव्यवस्था अडचणीत: 4.1%
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव: 9%
संविधानिक मूल्यांची पायमल्ली: 2.2%
वरीलपैकी सर्व: 14.6%
वरीलपैकी एकही नाही: 19.5%
या प्रश्नावर राज्यातील मतदारांनी दिलेला कल पाहता विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांपैकी कोणत्या आरोपात आपल्याला तथ्य वाटतं नसल्याचं जास्त मतदारांचं मत आहे.