PM Modi Cars : टँकपेक्षा कमी नसतात पंतप्रधान मोदींच्या गाड्या, सुरक्षेत असतात सदैव तत्पर

नरेंद्र मोदी हे असे नाव आहे ज्याची गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली आहे
PM Modi Cars
PM Modi Cars esakal

PM Modi Cars : नरेंद्र मोदी हे असे नाव आहे ज्याची गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा देशाची सूत्रे हाती घेतलेल्या मोदींना 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. आता त्यांना पंतप्रधान होऊन नऊ वर्षे झाली आहेत.

PM Modi Cars
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

कोणत्याही देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत कोणतीही हायगय केली जात नाही. ते ज्या गाड्या चालवतात त्याही बख्तरबंद टँकसारख्या असतात. आज आपण बघुया मोदी पंतप्रधान असताना त्यांच्याकडे कोणत्या गाड्या होत्या. याशिवाय सध्या उपलब्ध असलेल्या कारचे तपशीलही पाहू. जाणून घेऊया महिंद्रा ते मर्सिडीज पर्यंत.

PM Modi Cars
Diesel Cars : डिझेल गाड्यांची अशी घ्या काळजी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

महिंद्रा स्कॉर्पिओ 4X4

महिंद्रा स्कॉर्पिओ ही या यादीतील सर्वात साधी कार आहे. मात्र, नरेंद्र मोदींच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या गाडीत सामान्य असं काही नाही. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्कॉर्पिओ गाडीही घेतली आहे. स्कॉर्पिओमध्ये अनेक बदल करण्यात आले होते जेणेकरून ते गोळ्या आणि बॉम्बपासून संरक्षण करू शकेल.

BMW 7 Series 760 Li हाय-सिक्योरिटी एडिशन

BMW 7 सिरीज ही मोदींच्या आवडत्या राईडपैकी एक मानली जाते. मोदींनी जेव्हा ही कार घेतली तेव्हा ती जगातील सर्वात सुरक्षित कार होती. त्यात संरक्षणाचे थर होते, ज्यामुळे पीएम मोदींची सुरक्षा कडेकोट होती. त्यात इनबिल्ट ऑक्सिजन आहे, जेणेकरून रासायनिक हल्ला झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ नये.

PM Modi Cars
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Land Rover Range Rover HSE

पीएम मोदींना अनेक वेळा लँड रोव्हर रेंज रोव्हर HSE मध्ये बसलेलं पाहिलं असेल. वास्तविक लँड रोव्हर रेंज रोव्हरने बीएमडब्ल्यू 7 सीरीजची जागा घेतली होती. लँड रोव्हरचे हे मॉडेल देखील पूर्णपणे आर्मर्ड होते. यात 5L सुपरचार्ज केलेल्या V8 इंजिनची शक्ती मिळते. आयईडी स्फोट आणि फायर यांपासूनही कार सुरक्षित होती.

PM Modi Cars
तुम्ही कधी टरबूज खाण्याचे तोटे वाचलेत का? Health Tips

Mercedes-Maybach S650

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मर्सिडीजची आलिशान लिमोझिन पहिल्यांदा दिसली होती. या आलिशान आणि सुंदर कारने लँड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू सारख्या कारची जागा घेतली. Mercedes Maybach S650 ही पंतप्रधानांची मुख्य कार आहे.

PM Modi Cars
Health Tips: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताय तर थांबा, होईल नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mercedes Maybach A650 VR-10 लेव्हल प्रोटेक्शनसह येतो. कोणत्याही कारमध्ये उपलब्ध असलेली ही सर्वोच्च संरक्षण पातळी आहे. या कारवर AK47 बुलेट आणि 15 किलो TNT ब्लास्टचा परिणाम होत नाही, असं म्हटलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com