
Navi Mumbai Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. बुधवारी मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं. तसेच मेट्रो ३च्या अंतिम टपप्याचंही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.