मोदींनी नाकारली "राज'की बात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - मुंबईत भाजपचा पहिला महापौर व्हावा म्हणून भाजपने मनसेशी युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री आणि मनसेच्या अध्यक्षांमध्ये चर्चाही झाली होती; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे या नव्या युतीला नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपकडे 84 नगरसेवकांची कुमक होती; तर शिवसेनेकडे 88 नगरसेवकांची. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपला मनसेच्या सात नगरसेवकांची मदत आवश्‍यक होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची तयारीही दाखवली होती. ही युती झाली असती, तर विधानसभा निवडणुकीत सध्या कोमामध्ये असलेल्या मनसेला टॉनिक मिळण्याची शक्‍यता होती. मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी तत्काळ ही नवी युती करण्यास नकार दिला. मनसेचा पाठिंबा घेतला असता तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला असता. त्यामुळे ही युती नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: narendra modi neglect to raj talking