'चायवाला म्हणत मोदींनी देशाला मुर्ख बनवलं; गुजरात मॉडेल खोटं'

narendra modi
narendra modifile photo

चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं आहे. गुजरात मॉडेलपण खोटं आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. सचिन सावंत यांनी मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मोदी यांची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप या असोसिएशनचे प्रल्हाद मोदी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं. यावेळी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी मोदी चहावाले नाहीत, आम्ही सर्व भावडांनी चहा विकला आहे. त्यामुळे मोदींना चहावालं म्हणणं चुकीचं आहे. असं म्हटलं होतं. हाच धागा पकडनू काँग्रेसने मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.

narendra modi
"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"

सचिन सावंत यांचं ट्विट-

खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं! मोदींची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे. त्यावर भूलून मत दिल्यावर हात रितेच राहणार. मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदीच म्हणाले की मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं!

मोदींचे भाऊ काय म्हणाले?

आम्ही सर्वच भावडांनी चहा विकला आहे. पण ज्याचा मुकट मोठा त्याचीच चलती आहे. वडील चहा विकायचे त्यामुळे मोदींना चहावाल्याचा मुलगा म्हणायला हवं. चहावाला म्हणणं चुकीचं आहे, असं मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com