Nashik Bus Accident: नाशिक बस अपघातातील ८ मृतदेहांची ओळख पटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Accident

Nashik Bus Accident: नाशिक बस अपघातातील ८ मृतदेहांची ओळख पटली

नाशिकमध्ये शुक्रवारी खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये अपघातानंतर आग लागली होती. आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक बसल्यामुळं हा अपघात घडला होता. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. पाहता-पाहता ही आग पसरत गेली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती.

अपघातावेळी बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते, त्यातील 12 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटली नव्हती दरम्यान डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मृतांपैकी आठ मृतांची ओळख पटली असून तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा: Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा खेळखंडोबा केला; त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

या अपघातातील अजूनही काही मृतांची ओळख पटली नसून,डीएनए चाचणीसह फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्टची प्रतिक्षा प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यात पाच मृत घेण्यासाठी नातेवाईक आले नसून प्रशासन त्यांच्याशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रियेत आहे.

ओळख पटलेल्यांची नावे

बुलडाणा येथील कल्याणी मुधोळकर, पार्वती मुधोळकर

यवतमाळ जिल्ह्यातील शंकर कुचनकर

वाशीम येथील उद्धव भिलंग, वैभव भिलंग, साहिल चंद्रशेखर, अशोक बनसोड, ब्राम्हदत्त मनवर या आठ जणांची ओळख पटली आहे.

टॅग्स :Nashiknashik bus service