सोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक; शेतकरी दरोडेखोर, मग कर्जबाजारी कसे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

नाशिक येथे शेतकरी संपाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी 'महाराष्ट्र बंद' संपूर्ण राज्यभरात होणारच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. तसेच, पूर्ण राज्यभरातून लोक सहभागी होत असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली. यावेळी विविध भागांतून आलेले शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

नाशिक : उद्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ देऊ नका. पोलिसांनी सुद्धा संरक्षणात माल सोडणाचे पाप करू नये. संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. शेती आणि पूरक व्यवसायासह उत्पादन खर्चावर आधारित भाव कायद्याने मिळावा. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई कायद्याने सरकारची जबाबदारी असावी. शेतकरी दरोडेखोर मग कर्जबाजारी कसे? डोके पाहिजे ना सरकारला, असा खरमरीत टीका शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली. 

दरम्यान, नाशिक येथे शेतकरी संपाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी 'महाराष्ट्र बंद' संपूर्ण राज्यभरात होणारच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. तसेच, पूर्ण राज्यभरातून लोक सहभागी होत असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली. यावेळी विविध भागांतून आलेले शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या संपाचे 'पुणतांबे' होऊ देणार नाही. सरकारला 3 वर्षे पुरेसा वेळ मिळाला. सरकार शेतकरी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. हमीभाव दिला नाही. कर्जमुक्ती दान देत नाही. तुम्ही केलेली लूट मागतोय, असे शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. रामचंद्र बापू पाटील, डॉ अजित नवले, डॉ बुधाजीराव मुळीक यावेळी उपस्थित होते. 

अजित नवले म्हणाले, "सरकारने दडपशाही थांबवा. गुन्हे मागे घ्यावेत. एका शेतकऱ्याला त्रास झाल्यास सरकारला पळो कि सळो करून सोडू. मुख्यमंत्री यांनी विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसला. संप फोडण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या बंदमुळे सरकारला नाक घासावे लागेल. 

पोलिसांकरवी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
शेतकरी जिंकल्याशिवाय संप मिटणार नाही. संपाचे नेतृत्व शेतकरी करतील. सरकार पोलिसांकडून शेतकरी आंदोलन चिरडू पाहत आहे. उद्या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्र सहभागी होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

संप फोडल्याचा आनंद मुख्यमंत्री यांना झाला असेल, पण सरकारने धूळफेक करू नये. सरकारने हस्तक्षेप थांबवून खुल्या अर्थव्यवस्थेचा शेतकऱ्यांना फायदा होऊ द्या, असे आवाहन शेतकरी संघटना नेते रामचंद्र बापू पाटील यांनी केले. सरसकट कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचं सरकारकडे घेणं आहे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय, असे त्यांनी सांगितले. 

शेतकरी संप बैठकीतील ठराव

संपात सहभागी शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घ्या
संपाने केलेल्या मागण्यांवर आश्वासन नको 
मुख्यमंत्र्यांनी मान्य करेपर्यंत आम्ही हटणार नाही
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग 
8 जूनला नाशिक मध्ये राज्यव्यापी परिषद
6 जूनला शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक

Web Title: nashik news farmers strike maharashtra bandh on monday