राज्यातील 107 प्रकल्पांसाठी केंद्राकडून दहा हजार कोटी - गिरीश महाजन

राज्यातील 107 प्रकल्पांसाठी केंद्राकडून दहा हजार कोटी - गिरीश महाजन

नाशिक - ""विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील 107 प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. बहुतांश प्रकल्पांची कामे रखडलेली असून, दीड-दोन वर्षांत सर्व प्रकल्प पूर्ण केले जातील. यातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचणार असून, दीड लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली येईल,'' अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी आलेल्या महाजन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची बैठक फलदायी ठरली. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्राने दिलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. 107 पैकी 83 लघू प्रकल्प असून, येत्या वर्षभरात त्यांचे काम पूर्ण केले जाईल. उर्वरित प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com