आता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

नाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, ""जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की "राज ठाकरे जमिनीवर आले.' मला संवाद साधायचा आहे,'' असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले. 

महापालिका निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनंतर पदाधिकारी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांचे आज शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपली सत्ता गेली अन्‌ विकासकामांचे वाटोळे झाले. महापालिकेच्या आपल्या काळात आपण केलेली विकासकामे सत्ताधारी भाजपवाल्यांनी स्मार्टसिटीमध्ये घुसवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शहरात गुन्हेगारी वाढलीय, साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे, आपल्या काळातील प्रकल्पांची वाट लावली, गरज नसताना जुन्या रस्त्यांवर डांबर ओतण्यासाठी अडीचशे कोटींचा खर्च केला जात आहे, इथपासून ते मराठी क्रमांकाच्या नंबरप्लेट काढून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जातोय इथपर्यंतच्या मनातील भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मोकळ्या केल्या. 

लोकांना विकास कळत नाही 
कार्यकर्त्यांकडून तक्रारींचा ओघ सुरू असताना लोकांना या गोष्टी माहीत आहे का, असा सवाल करताच "होय' असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. लोक विकासाच्या एरवी गप्पा मारतात; परंतु मतदानाच्या वेळी विकास विसरतात, असे सांगत राज यांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवाची खदखद व्यक्त केली. 

Web Title: nashik news MNS raj thackeray