कांद्याचे भाव घसरल्याने निर्यात मूल्य शून्य करावेः मुंढे

संतोष विंचू
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

येवला : काद्याचे भाव घसरू लागल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे. त्यामूळे शासनाने शेतकरी हिताचा विचार करून निर्यात मूल्य शून्य करावे, अशी मागणी येथील भाजपाच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन केली आहे.

येवला : काद्याचे भाव घसरू लागल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे. त्यामूळे शासनाने शेतकरी हिताचा विचार करून निर्यात मूल्य शून्य करावे, अशी मागणी येथील भाजपाच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन केली आहे.

येथील भाजपा सरचिटणीस हरीश मुंढे, युवा मोर्चा सरचिटणीस अंबादास मुंढे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुर्हे, कृष्णा कव्हात, अरुण आव्हाड, तुकाराम वाळुंज, राम शेळके व कार्यकर्ते आज फुंडकर यांच्या भेटीला गेले होते.यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून सांगत त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी तालुक्यात व परिसरात जेमतेम पाऊस झाला असून अवर्षणप्रवण भागात तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यात असलेल्या थोड़या पाण्याने कांदा लागवड घटली असून परिणामी लाल कांद्याची आवक कमी असल्याने शेतकरी वर्गला चांगला भाव भेटला.

त्यात आता आवक वाढल्याने भाव कोसळत आहे. याचा मोठा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. निर्यात मूल्य ७०० डॉलर प्रति टन असल्याने व्यापारी वर्गला ही निर्यात करने अवघड झाले आहे. त्यात चीन व पाकिस्तान मध्ये निर्यात बंधन नसल्याने त्यांचा कांदा स्वस्त पडतो आहे,त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी नाही. आगामी काळात उन्हाळ कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होईल.जर निर्यात मूल्य कमी केले नाही तर कांदा हे पिक शेतकरी वर्गाला मातीमोल भावामध्ये विकावे लागेल. त्यामुळे आत्ताच उपाय योजना करुण निर्यात मूल्य हे शून्य करावे व कांदा निर्यात निर्बंध हटवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कृषिमंत्री फुंडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, केंद्रीय कृषिमंत्री यांच्या सोबत चर्चा करुण पूर्ण परीस्थितीचा आढावा दिला. तसेच मी स्वतः दिल्लीला जाउन याचा पाठपुरवठा करेल व गरज पडली तर तुमच्या शिष्ठमंडळला पण आमंत्रित करेन असेही फुंडकर यांनी सांगितले.

Web Title: nashik news yeola onion rate farmer pandurang fundkar