Nashik Padvidhar Election : भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार? प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केली महत्वाची भूमिका

नाशिकची पदवीधर निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
Nashik Padvidhar Election
Nashik Padvidhar Electionesakal
Summary

सध्या महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडलीये. नागपूर काॅंग्रसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पहायला मिळत आहेत.

Nashik Padvidhar Election : नाशिकची पदवीधर निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीही (NCP) पाठिंबा देईल, असं चित्र आहे. पण, सत्यजित तांबेंवरुन संभ्रम कायम आहे.

भाजप पाठिंबा देणार की नाही? हे अजून स्पष्ट नाहीये. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत असली तरी पाठिंब्यावरुन जो सस्पेंस आहे, त्यावरुन मतदार संभ्रमात आहेत. शुभांगी पाटलांना ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय. पण, मविआचा पाठिंबा अद्याप घोषित झालेला नाहीये.

Nashik Padvidhar Election
BJP National Meeting : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील; अमित शहांचं मोठं वक्तव्य

नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमध्येच लढाई होणार असून भाजपा तसंच महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलीये. याच पाठिंब्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अधिक माहिती दिली. आम्हाला अद्याप कोणीही पाठिंबा मागितलेला नाही, असं बावनकुळेंनी जाहीर केलं.

Nashik Padvidhar Election
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर

याबाबत भाजप लवकरच आपली भूमिका स्पष्ट करेल. शिवाय, सत्यजीत तांबेंनी आपल्याकडं समर्थन मागितलं तर त्याचा विचार करु. सध्या भाजप अपक्षाच्या भूमिकेत असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

Nashik Padvidhar Election
Gujarat : आलिशान जीवनाचा त्याग, करोडोंची संपत्ती नाकारली.. हिरे व्यापाऱ्याची 8 वर्षांची मुलगी झाली 'संन्यासी'

बावनकुळे म्हणाले, 'सध्या महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडलीये. नागपूर काॅंग्रसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पहायला मिळत आहेत. काॅंग्रेसकडं नेतृत्वाचा अभाव दिसत आहे. राज्यसभेत काॅंग्रेसची वाईट अवस्था झालीये. उध्दव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पाहाला मिळत आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com