
Nashik Police counselled young girls who made ‘Bhai Giri’ style reels, leading to their public apology that went viral on social media.
esakal
Nashik Police Take Action Against Viral Bhai Giri Reels: नाशिकमध्ये भाईगिरी स्टाईल रिल बनवणाऱ्या दोन तरूणींना, देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत, वठणीवर आणलं आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात या दोन तरुणींनी बनवलेली एक रिल व्हायरल होत होती.
ज्यामध्ये या तरूणी ‘’हे नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर इज्जत भेटन, नाहीतर तुझी डेडबॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटन. हॅशटॅग नाशिककर, समझनेवालोको इशारा काफी है. नाद नाही करायचा, ताणून मारते ताणून.’’ असं म्हणताना दिसत आहेत.
यानंतर मग पोलिसांनी या दोघींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आणि मग जेव्हा पोलिसांकडून यथोचित समाचार घेतला गेला, त्यानंतर मग पुन्हा या दोन मुलींनी पोलिसांसमोर उभा राहून हात जोडून आपल्या कृत्याची माफी मागितली.
माफी मागतानाच्या व्हिडिओत त्या तरूणी हात जोडून म्हणताना दिसत आहेत, की ''कुणीही अशाप्रकारचा व्हिडिओ बनवू नका. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.'' शिवाय, पायल पठारे आणि गौरी पवार अशी नावंही या दोन तरूणींची सांगितील आहेत.
याचबरोबर, त्यांनी हे देखील कबूल केली की ''आमच्याकडून नाशिकच्या गुन्हेगारीबाबत व्हिडिओ बनवण्यात आला आहे आणि आमच्यावर कारवाई झाली आहे.'' तसेच, ''नाशिककरांना नम्र विनंती आहे की कुणीही असे व्हिडिओ बनवू नका. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.'' असंही त्या तरूणी म्हणाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.