स्मार्ट शहरांतील जगणं सुसह्य करणाऱ्या उपकरणांचे दालन खुले !  ... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नाशिक ः स्मार्ट शहरांमधील जगणं सुसह्य करणाऱ्या स्मार्ट तंत्राच्या उपकरणाचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले. पाण्याच्या योग्य वापराचे तंत्र, सैन्य दलाच्या सुरक्षेचा रोबोट, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, आहाराचे नियोजन, प्लॅस्टीकचा वापर करुन बांधकाम साहित्याची निर्मिती, पाण्याच्या वापरातून भूजल पातळी विकासासाठी उपयोग अशा विविध संशोधनाचे आविष्कार "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'मध्ये उपलब्ध आहेत. नाशिकमधील संशोधकांसाठी यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

नाशिक ः स्मार्ट शहरांमधील जगणं सुसह्य करणाऱ्या स्मार्ट तंत्राच्या उपकरणाचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले. पाण्याच्या योग्य वापराचे तंत्र, सैन्य दलाच्या सुरक्षेचा रोबोट, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, आहाराचे नियोजन, प्लॅस्टीकचा वापर करुन बांधकाम साहित्याची निर्मिती, पाण्याच्या वापरातून भूजल पातळी विकासासाठी उपयोग अशा विविध संशोधनाचे आविष्कार "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'मध्ये उपलब्ध आहेत. नाशिकमधील संशोधकांसाठी यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते "फेस्ट'चा शानदार उद्‌घाटन सोहळा झाला. सामाजिक जीवनातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक-प्राध्यापक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी साकारलेले प्रकल्पांचे दालन "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ऍड्‌. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आले आहे.

उद्‌घाटन सोहळ्यासाठी महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, तंत्रशिक्षण सहसंचालक 
डॉ. डी. पी. नाठे, "मविप्र'च्या सरचिटणीस निलीमाताई पवार, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, नाशिक महापालिकेच्या शिक्षण समितीचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, नॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिरोडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी, अपूर्वा जाखडी, ऍड्‌. ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. होळकर, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना थेट बाजापेठेला जोडणाऱ्या व्यवस्था,सौरऊर्जेवर चालणारी शेतीची उपकरणे, शेतीची अवजारे, कृषी प्रक्रियाच्या स्मार्ट तंत्राचा "फेस्ट'मध्ये समावेश आहे. वैद्यकीय, वास्तुविशारद, औषधनिर्माणशास्त्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी आपले संशोधनासह "फेस्ट'मध्ये सामील झाले आहेत.

राष्ट्रीयस्तरावर निवड झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे "फेस्ट'मध्ये ठेवली आहेत. तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य मिळवावे तरुणांनी वैज्ञानिकदृष्टीकोन ठेऊन निर्णय घ्यायला हवेत. त्यादृष्टीने वाचन करावे. विचार करावा आणि पुढे जाण्याची दिशा निश्‍चित करावी, असे सांगून विभागीय आयुक्तांनी तरुणांनी रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करायला हवे, यावर भर दिला. नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल "सकाळ'चे कौतुक करत सौ. सांगळे यांनी कमी पाण्यात फायदेशीर शेती व्हावी यादृष्टीने संशोधनावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री. कुलकर्णी यांनी पेटंट मिळवणे, "स्टार्ट-अप', कौशल्यासंबंधी विद्यार्थ्यांना अन्‌ संशोधकांना सहकार्य करण्याची ग्वाही देत संशोधनातून शेतकरी आणि देशवासिय सुखी व्हावेत असा आग्रह धरला. प्रत्येक विद्यार्थी नाविन्यतेचा विचार करतो असा विश्‍वास डॉ. नाठे यांनी मांडला. श्री. शिरोडे यांना आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा, असे अधोरेखित केले. प्रा. रहाळकर, श्री. जाधव, डॉ. होळकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या पिढीचे उज्वल भविष्य काय आहे याची प्रचिती यावी आणि संशोधन-प्रकल्पांचे उद्योगात रुपांतर व्हावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे श्रीमंत माने यांनी सांगितले. श्री. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. पाटील यांनी आभार मानले. 

"फेस्ट' आजही सुरु 
"नाशिक इनोव्हेशन फेस्ट' उद्या (ता. 16) सायंकाळपर्यंत शेतकरी, गृहिणी, तरुण, विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. "फेस्ट'मधील तीन गटातील विजेत्यांचा 
सन्मान "सकाळ'च्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात शनिवारी (ता. 17) सायंकाळी सहाला नाशिकमधील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात गौरवण्यात येईल. "इस्त्रो'चे माजी संचालक आणि इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. डॉ. नाईक हे यावेळी "फ्युचर इन स्पेस सायन्स' याविषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. 
... 

Web Title: NASIK _INVOATION FEAST

टॅग्स