अंबानीसह शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती; पाहा कोण कोण पोहचले?

टीम-ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुरुजांचे तट असलेले भव्य स्टेज बनविला आहे. अत्यंत भव्यदिव्य रुपात झालेल्या या सोहळ्याला सुमारे लाखभर नागरिकांची उपस्थिती आहे. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे लाखभर नागरिक उपस्थित होते. याशिवाय राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारही यावेळी उपस्थित होते.

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली असून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच देश पातळीवरील अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुरुजांचे तट असलेले भव्य स्टेज बनविला आहे. अत्यंत भव्यदिव्य रुपात झालेल्या या सोहळ्याला सुमारे लाखभर नागरिकांची उपस्थिती आहे. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे लाखभर नागरिक उपस्थित होते. याशिवाय राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारही यावेळी उपस्थित होते. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. महाशपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवाजी पार्कवर जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. 

सरकारचं ठरलं ! दहा रुपयांत जेवण तर, एक रुपयात वैद्यकीय सेवा

 • शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख)
 • कपिल सिब्बल (काँग्रेस नेते)
 • एम के स्टॅलिन (डीएमके प्रमुख)
 • कमलनाथ (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)
 • राज ठाकरे (मनसे प्रमुख)
 • अहमद पटेल (कॉंग्रेस नेते)
 • मल्लिकार्जून खर्गे (कॉंग्रेस नेते)
 • सी. वेणूगोपाल (कॉंग्रेस नेते)
 • राजीव सातव (काँग्रेस नेते)
 • अभिषेक मनू सिंघवी (काँग्रेस नेते)
 • मनोहर जोशी (माजी मुख्यमंत्री)
 • देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री)
 • सुशिलकुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री)
 • सुप्रिया सुळे (खासदार)
 • अजित पवार (माजी उपमुख्यमंत्री)
 • टी आर बालू (डीएमके नेते)
 • पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
 • अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
 • अमित ठाकरे
 • मुकेश अंबानी (उद्योजक)
 • प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादीचे नेते)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national leaders were present at uddhav thackeray cm oath ceremony maharashtra