सरकारचं ठरलं; 10 रुपयांत जेवण आणि 1 रुपयांत वैद्यकीय मदत मिळणार!

टीम ई-सकाळ
Thursday, 28 November 2019

शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकविमा आणि नुकसान भरपाईची मदत करण्याकडे प्राधान्य राहील.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आज महाविकास आघाडीतील काही मंत्री शपथ घेणार आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यानंतर होणाऱ्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत ठाकरे सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टीमुळे अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला आहे. 

- नव्या सरकारच्या कॅबिनेटची आजच बैठक; पहिला निर्णय काय असेल?

तसेच या किमान समान कार्यक्रमच्या जाहीरनाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी आणि 1 रुपयात वैद्यकीय मदत दिली जाणार असल्याचे नमूद केले आहे. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. 

- शेतकऱ्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

यामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकविमा आणि नुकसान भरपाईची मदत करण्याकडे प्राधान्य राहील. तसेच हमीभाव, दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यात आलं आहे.

- किमान समान कार्यक्रमात उद्योग आणि रोजगारांसाठी मोठी घोषणा

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वसामान्य मराठी माणसासाठी 10 रुपयांत जेवण आणि 1 रुपयांत वैद्यकीय मदत मिळण्यासाठी लवकरच पावले उचलतील, याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aghadi declared 10 rupees for meal and 1 rupee for clinic help in common minimum program