नवी मुंबई, रायगडला दिलासा; नवीन रुग्णांची संख्या ६० पेक्षा कमी |corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नवी मुंबई, रायगडला दिलासा; नवीन रुग्णांची संख्या ६० पेक्षा कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई / अलिबाग : नवी मुंबई आणि रायगड (Navi Mumbai and raigad) जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) शिखरावर असताना रुग्णालयांत घाटाही उपलब्ध होत नव्हत्या. रायगडमध्ये दररोज सुमारे दोन हजार रुग्ण (corona patients) सापडत होते. अशीच भीषण परिस्थिती नवी मुंबईत होती; परंतु आता या आजाराचा विळखा सैल झाला आहे. दररोज ६० पेक्षा कमी नवीन रुग्णांची (corona patients decreases) भर पडत आहे. नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने कमी केले. त्यानंतरही शहरात रुग्ण नियंत्रणात ठेवण्यात नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांना यश आले आहे. दिवाळी झाल्यानंतरही नवी मुंबईत गुरुवारी (ता.१८) पर्यंत ५८ नवीन रुग्णांची भर पडली. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला अधिक कोविड चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

दिवसाला तीन ते चार हजार चाचण्यांचे प्रमाण वाढवून आता ही संख्या दिवसाला सात हजार चाचण्यांच्या घरात आहे. एवढ्या अधिक प्रमाणात चाचण्यानंतरही नवी मुंबईत दिवसाला सरासरी २५ रुग्ण सापडत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाला आहे. शून्य मृत्यूच्या दिनाचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये वाढले आहे. या शहरात आता सरासरी ५० पर्यंत नवीन रुग्ण सापडत आहेत.

पनवेल महापालिकेच्या हद्दीतही रुग्णांची संख्या उतरणीला लागली आहे. गणेशोत्सवानंतरचा रुग्णांचा उतरता आलेख दिवाळी सणानंतरही कायम आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीत १३८ रुग्ण उपचार घेत आहेत. ७ नोव्हेंबरपर्यंत शहरात २१० रुग्ण उपचार घेत होते. त्यानंतर १७ नोव्हेबरपर्यंत शहरात ७२ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच पनवेल महापालिकेतही दिवसाला सरासरी तीन हजार चाचण्या केल्या जातात; परंतु दिवसाला सरासरी १५ रुग्ण सापडत आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये कोविड रुग्णांची संख्या मर्यादित असल्याने कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी दिसते.

loading image
go to top