
राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी; काय झाला युक्तीवाद?
मुंबई (वांद्रे) : हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या वाद शिगेला गेलेला काल आपल्याला पहायला मिळाला होता. त्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानावर गोंधळ घातला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला काल पोलिसांनी अटक करुन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात सुनावणी झाली आहे. त्यामध्ये त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू न्यायालयात मांडली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांकडून युक्तीवाद केला आहे. त्यानंतर वांद्रे कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा: उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम, गॅंगवॉरला सुरुवात - नितेश राणे
राणांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरचं वाचन सरकारी वकीलांनी कोर्टात केलं. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम १५३ ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. हे आंदोलन करण्यामागे कुणाचा हात होता का याचा आम्हाला सखोल तपास करायचा असून त्यासाठी आम्हाला वेळ हवा असल्यामुळे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी त्यांनी केली.
त्यानंतर रिझवान मर्चंट यांनी कोठडीची मागणी ही योग्य नाही म्हणत आक्षेप घेतला होता. कुणालाही अटक करण्यापूर्वी नोटीस देणं गरजेचं असतं असं त्यांनी बचाव करताना सांगितलं होतं. तसेच राणा दाम्पत्यांवर लावलेल्या कलमांवर आक्षेप त्यांनी घेतला असून आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी यांच्यावर कारवाई का केली असा सवाल त्यांनी युक्तीवाद करताना केला.
त्यानंतर सरकारी वकिलांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा: भारतात हिंदूंच्या मुली पळवून नेतात अन्...; साध्वीचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य
दरम्यान काल मुख्यमंत्री यांच्या खासगी निवासस्थानाबाहोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गोंधळ घातला होता. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं आणि काल सायंकाळी राणा दाम्पत्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर वाद निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला असून रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू मांडली आहे.
Web Title: Navneet And Ravi Rana Court Judicial Custody Hanuman Chalisa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..