राणा दाम्पत्याच्या लव्हस्टोरी मागे आहे रामदेव बाबांच्या आश्रमाचे कनेक्शन |Navneet Ravi Rana and Ravi Rana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana and ravi rana

राणा दाम्पत्याच्या लव्हस्टोरी मागे आहे रामदेव बाबांच्या आश्रमाचे कनेक्शन

सध्या महाराष्ट्रात राणा दाम्पत्य चर्चेचा विषय आहे. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांची लवस्टोरी माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दोघांची भेट ही रामदेव बाबा यांच्या आश्रमात झाली होती. (Navneet kaur and ravi rana lovestory they met first time in ramdev baba aashram)

नवनीत कौर राणा

आताची खासदार नवनीत राणा एकेकाळी उत्तम अभिनेत्री होती. नवनीत कौर यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. तेलुगु चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. नवनीतचे आई-वडील पंजाबी आहेत. वडील सैन्यात अधिकारी होते. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर नवनीतने अभ्यास सोडला आणि मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी 6 म्युझिक अल्बममध्ये त्यांनी काम केले.

हेही वाचा: ...तर सरकारी कार्यालयात किती काळ वीज बंद राहील? शेलारांचा सरकारवर निशाणा

बाबा रामदेव यांच्या आश्रमात रवी राणा यांच्याशी भेट

बाबा रामदेव यांच्या आश्रमात नवनीत ची रवी राणा यांच्याशी ओळख झाली होती. योगामध्ये विशेष रुची असलेल्या नवनीत कौर राणा यांचा बाबा रामदेव यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. एका योग शिबिरात नवनीतने रवी राणा यांची भेट घेतली होती.

हेही वाचा: ब्राह्मण महासंघाच्या गदारोळानंतर अमोल मिटकरींचं तीन शब्दांत उत्तर

सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केला

नवनीत कौरने सामूहिक विवाह सोहळ्यात रवी राणाशी लग्न केले. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यात एकूण 3162 जोडप्यांचा विवाह झाला होता. आमदाराच्या या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती.यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव, सहारा प्रमुख सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय यांचाही सहभाग होता.

Web Title: Navneet Kaur And Ravi Rana Lovestory They Met First Time Un Ramdev Baba Aashram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top