
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार राणांच्या निशाण्यावर CM ठाकरे म्हणाल्या, भाषण ठोकण्यापेक्षा..
सध्या राज्यातील अगामी विविध निवडणुकांमुळे राजकीय वातवरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजकीय नेत्यांचे आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, आता खासदार नवनीत राणा यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभेत जाऊन भाषण ठोकण्यापेक्षा औरंगाबादकरांना (Aurangabad) पाणी द्यावे, असा टोमणा राणा यांनी लगावला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: फडणवीसांच्या ओएसडीने नेत्यांना धोबीपछाड देत विधानपरिषदेची उमेदवारी पटकावली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. यावरून विरोधकांनी सेनेला धारेवर धरलं आहे. त्या म्हणाल्या, मोठ्या हॉटेलमध्ये सर्व आमदरांना ठेवून प्रत्येक आमदारांसाठी ५० हजार रुपये रोज खर्चले जात आहेत. परंतु माझ्या शहरातील पाणीप्रश्न सोडवायला त्यांना वेळ नाही. राज्यात अनेक प्रश्न आहेत परंतु त्याकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना वेळ नाही. ते तर राज्यसभा निवडणुक आणि त्यासाठीचे मतदार असलेल्या आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहेत. (Navneet Rana)
पुढे त्या म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही याचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे. परंतु राज्य सरकार जर पाणी देवू शकत नसेल तर महानगरपालिकेने राज्याकडे आणि राज्याने केंद्राकडे अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठवावा, खासदार म्हणून मी तिथे पाठपुरावा करते. या सर्वासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वेळ नाही, त्यांना केवळ औरंगाबादमध्ये सभा घ्यायची आहे. मात्र त्यांनी पाण्याचा प्रश्नही सोडवावा असंही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा: योगींचा प्रचार ते दिपाली सय्यदवरील टीका, Bjp ने उमेदवारी दिलेल्या उमा खापरे कोण?
Web Title: Navneet Rana Criticised To Cm Thackeray On Aurangabad Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..