Shrikant Bhartiya I फडणवीसांच्या ओएसडीने नेत्यांना धोबीपछाड देत विधानपरिषदेची उमेदवारी पटकावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan parishad election 2022

निवडणुकीच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे

फडणवीसांच्या ओएसडीने नेत्यांना धोबीपछाड देत विधानपरिषदेची उमेदवारी पटकावली

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार आहे. दरम्यान, यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता भाजपाने कट केला असून यावेळी भाजपाने उमा खापरे (Uma Khapare) तसंच श्रीकांत भारतीय (shrikant bhartiya) या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपाने दिलेल्या या नव्या चेहऱ्यांमुळे यंदा विधान परिषद निवडणुक रंगणार असल्याची शक्यता आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडेंच्या नावासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. (vidhan parishad election 2022 maharashtra)

हेही वाचा: योगींचा प्रचार ते दिपाली सय्यदवरील टीका, Bjp ने उमेदवारी दिलेल्या उमा खापरे कोण?

विधान परिषद निवडणुकीसाठी यावेळी भाजपाने नवे चेहरे समोर आणले आहेत. यातील एक चेहरा म्हणजे श्रीकांत भारतीय. एक अभ्यासून नेतृत्व म्हणून भारतीय यांच्याकडे पाहिले जाते. फडणवीसांचे ओएसडी ते विधान परिषदेचे उमेदवार असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

या निवडणुकीच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपचच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ओएसडी असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या कारवर अज्ञातांकडून हल्ला झाला होता. २०१९ ला अमरावतीत ही घटना घडली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीशी या हल्ल्याचा संबंध जोडला गेला होता. मात्र सुदैवाने त्या हल्ल्यावेळी श्रीकांत भारतीय कुटुंबासह बाहेर गेले असल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यावेळी या घटनेमुळे त्यांची सुरक्षितता वाढवण्यात आली होती.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहे. यावेळीही पंकजा मुंडेंना हुलकावणी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमा खापरे तसंच श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेतेपदावर असलेले प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद लाड आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: Video: INS विक्रांत घोटाळ्याला भाजपाचं समर्थन आहे का?, राऊतांचा सवाल

Web Title: Who Is Shrikant Bhartiya Bjp Gives Vidhan Parishad Tickera Osd Of Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top