यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलंय; नवनीत राणांचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana and Yashomati Thakur

"यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलंय"

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा एकमेकांवर शाब्दीक वार सुरु असतो. अशातच खासदार नवनीत राणा यांनी मंत्री यशोमती ठाकूरवर जोरदार हल्लाबोल केलाय. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलंय, अशा शब्दात त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टिका केली. मतदार संघातील एका भुमीपुजनाच्या कार्यक्रमाला त्या बोलत होत्या.

हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकले 1200 महाराष्ट्रातील तरुण! एअर इंडियाची युक्रेनमध्ये दोन विमाने

यशोमती ठाकूर यावेळी बोलताना म्हणाल्या, “मोठी बहीण म्हणुन मी यशोमती ठाकूर यांना एक सल्ला देते. त्यांनी मनोरुग्णांच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्यावे. आणखी अडीच वर्षे बाकी आहेत. त्यामुळं त्यांनी आपला उपचार करावा. चुकीच्या पद्धतीने मंत्रीपद त्यांच्याकडे आले. त्यामुळे ते त्यांना डायजेस्ट होत नाही. मंत्रीपद त्यांच्या डोक्याच्या वर गेलंय”

Web Title: Navneet Rana Criticized To Yashomati Thakur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top