
शरद पवारांचे आशीर्वाद मला लाभले, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले : नवनीत राणा
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज रविवारी (ता.दहा) अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, शरद पवार यांच्या कार्यक्रमास मी जाणार आहे. त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. शरद पवार (Sharad Pawar) महान नेते असून सर्व जण त्यांच्याकडे पाहून राजकारणास सुरुवात करतात. मला देखील त्यांचे आशीर्वाद लाभले आहे, असे राणा म्हणाल्या. (Navneet Rana Says, I Have Reached Here Due To Blessing Of Sharad Pawar)
हेही वाचा: मोदींनी राशन दिलं, पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?: उद्धव ठाकरे
२०१९ नंतर अमरावतीत (Amravati) पवार साहेब आले असता त्यांचे मी स्वागत केले होते. ते महाराष्ट्राचे महान नेते आहेत. अनेक जणांना त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. राज्यात विजेचे मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकरी अडचणीत आहेत यासह इतर मागण्या नवनीत राणा (Navneet Rana) या पवार यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा: भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? चंद्रकांत पाटलांचा CM ठाकरेंना सवाल
नवनीत राणा या महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संसदेत त्या आघाडीवर टीका करताना दिसतात. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी या दोन्ही पक्षांची साथ सोडल्याचे दिसते. आज शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सदरील विधान त्यांनी केले आहे. मात्र राजकीय रंगभूमीत त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे ? हे समजायला वेळ मात्र लागेल.
Web Title: Navneet Rana Says I Have Reached Here Due To Blessing Of Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..