उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावे लागणार; राजीनाम्यानंतर नवनीत राणांचा टोला

Navneet Rana reaction on Uddhav Thackeray resignation
Navneet Rana reaction on Uddhav Thackeray resignationNavneet Rana reaction on Uddhav Thackeray resignation

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आहे. परंतु, खूप उशीर झाला आहे. ते शेवटपर्यंत पदाच्या लालसेत राहिले. ठाकरे यांना सत्तेचा लोभ असल्याचा टोमणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लगावला. (Navneet Rana reaction on Uddhav Thackeray resignation)

Navneet Rana reaction on Uddhav Thackeray resignation
‘ये दिन भी निकल जायंगे..’ संजय राऊतांचे ट्विट

एवढेच नाही तर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर विचारधारेशी तडजोड करीत वडिलांची मेहनत वाया घालवल्याचा आरोपही केला. शिवसेनेची (Shiv sena) स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. परंतु, उद्धव ठाकरेंनी ५६ वर्षांची मेहनत वाया घातली. आपल्या अहंकारामुळे त्यांनी पक्षाची ही अवस्था केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) फक्त संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य उरले आहेत, असेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

मला १४ दिवस तुरुंगात काढावे लागले. यात माझा काय दोष होता. फक्त हनुमान चालिसा वाचणार असेच म्हटले होते. मी राज्याच्या कल्याणासाठी हनुमान चालिसा वाचणार असल्याचे म्हटले होते. यामुळे मला तुरुंगात टाकले गेले, अशी आठवणही नवनीत राणा यांनी करून दिली. भोंग्यावरून सुरू झालेल्या वादात नवनीत राणा (Navneet Rana) आणि पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले होते.

Navneet Rana reaction on Uddhav Thackeray resignation
...ही शिवसेनेच्या भव्य विजयाची सुरुवात; संजय राऊतांचे पुन्हा ट्विट

नवनीत राणांनी दाखवली होती पुष्पा स्टाईल

दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी अर्ज भरला त्यावेळी नवनीत राणा या पुष्पा स्टाईलमध्ये दिसल्या होत्या. तेव्हा त्या काहीही बोलल्या नव्हत्या. तेव्हा त्यांची ही कृती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या संकटाशी जोडली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com