उद्या 'घट' बसतील; पण घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?

Shalinitai Thackeray
Shalinitai Thackerayesakal
Summary

गणेशोत्सव संपताच सर्वांनाच नवरात्रौत्सवाचे (Shardiya Navratri) वेध लागतात.

मुंबई : गणेशोत्सव संपताच सर्वांनाच नवरात्रौत्सवाचे (Shardiya Navratri) वेध लागतात. यंदा शारदीय नवरात्रौत्सव (Navratri Festival) नऊ ऐवजी 8 दिवसांचा असेल. तर, नवरात्रौत्सवाला उद्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. याच अनुषंगानं मनसेच्या शालिनीताई ठाकरे (MNS leader Shalinitai Thackeray) यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, उद्यापासून 'घट' बसतील; पण गेली दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) केलाय.

पुढे शालिनीताई म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मुसळधार पावसाने अनेकांचे नुकसान केले असून अद्याप ओला दुष्काळ फंड जाहीर झाला नाही, सरकार करतंय काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिवाय, राज्यात खड्डेमय रस्ते झाले असून यातून मार्ग काढाताना नाकी नऊ येत आहेत. यावरती भाष्य करताना त्यांनी हॅशटॅगही (#महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते) वापरले आहेत.

Shalinitai Thackeray
'जरंडेश्वर'ची पवार कुटुंबीयांकडून पळवा-पळवी करून लपवा छपवी'

दरम्यान, तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने नवरात्रौत्सव 8 दिवसांचा असेल. आश्विन शुद्ध प्रतिपदा यंदा उद्या 7 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात (Festival start) होते. यंदा विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra) 15 ऑक्टोबर या दिवशी आहे.

Shalinitai Thackeray
भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com