esakal | भाजप नेता व समीर वानखेडेंच्या भेटीचा Video जारी करणार; नवाब मलिकांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

भाजप नेता व समीर वानखेडेंच्या भेटीचा Video जारी करणार - मलिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) वर आरोप केलेत. तसेच छापेमारी पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. NCB अधिकारी समीर वानखेडे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते, त्यानुसार त्यांनी कारवाई केल्याचा आरोपनंतर आता तर नवाब मलिक हे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कुंबोज आणि समीर वानखेडे यांच्या कथित भेटीचा व्हिडीओ जारी करणार आहेत. असा खळबळजनक खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

कंबोज म्हणाले, मलिक हे भंगारवाला आहेत

काही लोकं मला 100 कोटींच्या नोटीसा पाठवणार आहेत. त्याची मी वाट पाहत आहे. बऱ्याच कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू असते. माझी ब्रँड व्हॅल्यू 100 कोटींची ठरवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावरही टीका केली. कंबोज म्हणाले मलिक हे भंगारवाला आहेत. होय, माझे वडील भंगारचा धंदा करायचे याचा अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटले नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, अशी टीका मलिक यांनी केली होती. युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते, असा दावाही मलिक यांनी केला होता.

हेही वाचा: आला दसरा, महागणार सोने! खरेदीसाठी 'ही' योग्य वेळ

कंबोज यांची मलिक यांना पाठवली नोटीस

क्रुझवरील ड्रग पार्टीवर जेव्हा रेड करण्यात आली तेव्हा भाजपाचे मोहित कंबोज यांच्या नातेवाईकाला सोडण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या प्रकरणी मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मोहित कंबोज यांनी सांगितलं होतं. त्यानंतरही मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला होता. त्यानंतर अखेर कंबोज यांनी मलिक यांना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: राज्यात २० हजारांची पदभरती करणार : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे

loading image
go to top