"पहिली पत्नी लोकांसमोर येऊ नये म्हणून वानखेडेंनी तिला..."; मलिकांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

"पहिली पत्नी लोकांसमोर येऊ नये म्हणून वानखेडेंनी..."; मलिकांचा आरोप

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. अनेक खळबळजनक आरोप करून त्यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईसहित त्यांनी खोट्या जातीच्या पुराव्यांवर नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला. त्यातच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. वानखेडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीला देखील फसवल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: आम्हाला झालेल्या त्रासाची किंमत मोजायला लावणार; राऊतांचा BJPला इशारा

समीर दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येतो आहे असं म्हणत वानखेडेंनी पहिल्या पत्नीला फसवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. वानखेडेंनी सुरूवातीला ज्या मुलीशी लग्न केलं होतं, तिच्याशी वाद झाल्यानंतर ड्रग्ज ठेऊन तिच्या नातेवाईकांना तुरुंगात टाकलं, कुटुंबीयांना धमकावण्यात आलं असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. आपली पहिली पत्नी समोर लोकासमोर येऊ नये यासाठी वानखेडेंनी तिला धमकावलं. वानखेडेंनी ड्रग पेडलरच्या माध्यमातून तिच्या घरात ड्रग्ज ठेऊन तिच्या कुटुंबावर कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: ''हिंदूत्व हे ब्रिटीश फुटबॉल संघाच्या गुंडासारखे'', शशी थरूर यांची टीका

loading image
go to top