esakal | राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik and jitendra awhad may minister in maharashtra Government From NCP

राज्यतील महाविकास आघाडीच्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित मानली जात आहेत.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यतील महाविकास आघाडीच्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित मानली जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोबतच, नवीनमध्ये अदिती तटकरे आणि शेखर निकम यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काळात पक्षवाढीसाठी मदत होईल या दृष्टीने सर्वच भागांना प्रतिनिधीत्व देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. त्यानुसार, कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात ऊस आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असला तरी, मात्र कोल्हापूरात राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या नेत्यांना शह देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचा धुरळा; तर भाजपचा पालापाचोळा

नागपूरातून अनिल देशमुख यांना पुन्हा मंत्री पदी संधी मिळणार असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, मुंबईतून नवाब मलिक यांचेही नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाड्यातून धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी 'या' आहेत महत्वाच्या दहा टिप्स

सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातून मकरंद पाटील यांची मंत्री मंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करून त्यांनाही मंत्रीपदाची संधी मिळू शकते. याशिवाय राज्यमंत्री पदी नगरचे आमदार संग्राम जगताप आणि कोकणातून शेखर निकम आणि आदिती तटकरे यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.