esakal | झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचा 'धुरळा', तर भाजपचा 'पालापाचोळा'
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Soren

झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून काँग्रेस आघाडीने मुसंडी मारल्याचे दिसत होते. अखेरपर्यंत हाच ट्रेंड असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी आवश्यक 41 जागांचा आकडा महाआघाडी पार करणार हे निश्चित आहे.  जेएमएमच्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचा 'धुरळा', तर भाजपचा 'पालापाचोळा'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रांची : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेतून बाहेर जावे लागणार हे निश्चित आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) व राष्ट्रीय जनता दल (राजद) या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत महाआघाडीने 42 जागांवर आघाडी घेतली असून, भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून काँग्रेस आघाडीने मुसंडी मारल्याचे दिसत होते. अखेरपर्यंत हाच ट्रेंड असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी आवश्यक 41 जागांचा आकडा महाआघाडी पार करणार हे निश्चित आहे.  जेएमएमच्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

झारखंडमध्ये जिंकलो, हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार : तेजस्वी यादव

झारखंडमध्ये 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. मागील विधानसभेत 37 जागा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला आहे. भाजपने स्वतंत्र्यपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका त्यांना बसल्याचे दिसत आहे. 

भाजप अजून एक राज्य गमावणार? काँग्रेसची मुसंडी...

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया झाल्यानंतर जाहीर झालेल्या कल चाचण्यांमध्ये राज्यातील भाजप सरकार पुनरागमन करण्याची शक्‍यता धूसर मानण्यात येत होती. कॉंग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राजद आघाडीला 41 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. बिहारचे विभाजन करून झारखंडची 2000 मध्ये निर्मिती झाल्यापासून भाजपचे नेते रघुबर दास हे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले नेते ठरले आहेत. आता मात्र, त्यांना पद सोडावे लागणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रातही नुकतेच भाजपने सत्ता गमाविली होती.
 

loading image
go to top