वक्फ बोर्डाच्या तीस हजार संस्थांची चौकशी करा; मलिकांचं ED ला आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab-Malik

"EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई: पुण्यात आज वक्फ बोर्डाच्या जमीण गैरव्यवहार प्रकरणी काही ठिकाणी ईडीकडून (ED) कारवाई झाल्याचं समोर आलं. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधीत या विभागावर ईडीच्या कारवाईची चर्चा सुरू होताच, नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी ईडीकडून कोणत्याच कार्यालयावर ईडीचे छापे पडले नसून, एका ट्रस्टवर छापा पडल्याचं सांगितलं. यावेळी नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डच्या कामाच्या पद्धतीबद्दल देखील माहिती दिली.

वक्फ बोर्डाच्या कामाची माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, "आम्ही मंत्री आहोत, वफ्फ बोर्डाला त्यांच्या कायद्यानुसार काम करायला परवानगी आहेत. आमच्याकडे काही तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाईही केली जाते. पहिल्यांदाच बोर्डाची निवडणूक घेण्यात आली. त्याच्यावर अधिकारी नेमण्यात आली होती. आता आणखी काही जागांवर निवडणूका होणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच फुल्ल फ्लेज बोर्ड तयार करण्यात आला आहे. जेव्हा राज्यात पहिल्यांदा वफ्फ बोर्ड तयार झाला तेव्हा त्याला पूर्ण वेळ अधिकारी नव्हता", असं यावेळी नवाब मलिकांनी स्पष्ट केलं. तसेच यावर्षी बोर्डानं सात एफआयआर फाईल केल्या आहेत. बीड, निमगाव, परभणी, जालना, औरंगाबाद या ठिकाणच्या एफआयआरमधून तक्रारी दाखल करुन अनेकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: छापे मारणारे आले तर त्यांचे स्वागतच करु - नवाब मलिक

वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण जेव्हा माझ्याकडे आले तेव्हापासून आपण कार्यवाही सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पारदर्शकपणे बोर्डाचे कामकाज सुरु राहावे असा प्रयत्न केला गेला आहे. बोर्डाची मिटींग होत नव्हती. सगळा मनमानीपणा होता. त्यामुळे आता त्याच्यावरही उपाययोजना करण्यात आली आहे. सगळे कामकाज आता डिजिटल पद्धतीनं सुरु झाले आहे. याशिवाय जी जूनी कागदपत्रे आहेत त्याचे स्कॅनिंग करुन त्यांना जतन करण्याचे काम सुरु झाले असल्याचे मलिक यांनी सांगितलं. "मी इडीला सांगेल की, त्यांनी 30 हजार वक्फ संस्थांची देखील तपासणी करावी. ते तपासणी करणार असेल तर मी त्यांचे स्वागतच करतो" असंही त्यांनी सांगितलं

हेही वाचा: पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग?

पूढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून जे आरोप होत आहेत त्यावरुन मलिक घाबरतील असे काहींना वाटत असेल मात्र ते खरे नाही. कुणाचीही प्रतिमा मलीन करु नका. कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे असं म्हणत त्यांनी आता लढाई त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे त्याला उत्तर देणार असून आम्ही अन्यायाच्या विरोधात लढण्याचे ठरवले आहे.

loading image
go to top