'हे तर फडणवीसांचं कारस्थान; राऊतांच्या पत्रावरून मलिकांचा टोला'

भाजपाला कुठल्याही पक्षासोबत त्यांना युती तयार होईल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे.
political
politicalesakal
Updated on
Summary

भाजपाला कुठल्याही पक्षासोबत त्यांना युती तयार होईल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहले आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

political
'दोन कॅबिनेट मंत्री आणि मध्यावधी निवडणुका..', राऊतांच्या पत्राने खळबळ

ते म्हणाले, राज्यातील भाजपाची सत्ता गेल्यानंतर भाजपातील नेत्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. कुठल्याही पक्षासोबत त्यांना युती तयार होईल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे ईडीची कारवाई लावली आहे. फडणवीसांना असे वाटते की, हे लोक घाबरून सरकारमधून बाहेर पडतील आणि त्यांच्यासोबत जातील. मात्र हा त्यांचा गैरसमज आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, कट कारस्थान करुन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचा दावा करणे, सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई होईल यासाठी प्रयत्न सुरु करणे हे सर्व काम ते करत असतात. या सगळ्याला योग्ये ती दिशा ते देतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र अशा प्रकारे भिती निर्माण करून कुठेही सत्ता काबीज करता येत नाही. हा महाराष्ट्र आहे. शरद पवार यांना नोटीस दिल्यानंतर तुमची अशी परिस्थिती झाली आहे. तुम्ही ताकदीचा वापर करून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार तितक्याच ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहून तुम्हाला उत्तर देईल. ईडी कारवाईल सगळे घाबरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

political
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह पाऊस, राजधानीला अवकाळीने झोडपलं

मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा ईडीकडून तपास सुरु असल्याचा दावा राऊत यांनी या पत्रात केला आहे. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानं माझ्यावरही निशाणा साधला जातो. राऊतांना जेलमध्ये टाकण्याची भिती दाखवली जाते. भाजपाकडून ठाकेर सरकार पाडण्यासाठी दबाव सुरु आहे. यासाठी रोज ते प्रत्येक नेत्याचे मागे ईडी लावाण्याची भिती दाखवतात. एक पोलिस आधिकारी राजीनाम देतो आणि त्याच अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशमधून तिकीट दिले जाते. हे काय आहे. आता हे अधिकार पण पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत का? असा सवाल ही त्यांनी केला सत्ता ही कायमची राहत नाही. अधिकाऱ्यांनी त्यांची काम केली पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com