Nawab Malik I नवाब मलिकांची कोठडी 20 मेपर्यंत वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार का?

नवाब मलिकांची कोठडी 20 मेपर्यंत वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल

मागील काही दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरु आहे. आता न्यायालयाने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार का असा सवाल उपस्थित होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं मलिकांचा कोठडीतील मुक्काम २० मे पर्यंत वाढला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पी. एम. एल. ए. न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे. ईडीने मलिकांच्या या प्रकरणात 5000 पेक्षा अधिक पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे.

हेही वाचा: ईडीची मोठी कारवाई, देशभरात १८ ठिकाणी छापेमारी

मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक करण्यात आली आहे. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. मंत्री नवाब मलिक यांना यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांच्या कोठडीत आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकलेला नाही. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला होता. त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली होती. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज विशेष ईडी न्यायालयाने सुनावणी केली असून यात त्यांना २० मे पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंना दुसरा झटका! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी

Web Title: Nawab Malik Custody Extended Till May 20 Special Ed Court Decision Take

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top