"ही वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी..."; नवाब मलिकांचं नवं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

"ही वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी..."; नवाब मलिकांचं नवं ट्विट

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची झोड उठवली आहे. काही दिवस शांत असलेल्या नवाब मलिकांनी आता पुन्हा एक नविन ट्विट करत या प्रकरणात ट्विस्ट निर्माण केला आहे. एनसीबीने क्रूझ ड्रग्ज पार्टीवर केलेली कारवाई ही ठरवून झाली असून, या कारवाईमध्ये काही लोकांना ठरवून पकडण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. आता नवाब मलिकांनी याच गोष्टीचे काही पुरावे समोर ठेवले आहे.

हेही वाचा: ''पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी''

नवाब मलिक यांनी नुकतेच एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी काही स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. "हे के.पी. गोसावी आणि एका माहिती देणार्‍या व्यक्तीचा व्हाट्सअॅप वरील संवाद आहे. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीला जाणाऱ्या लोकांना कसे अडकवायचे हे यामधून दिसून येते. समीर दाऊद वानखेडेची प्रायव्हेट आर्मी असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.

हेही वाचा: राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये, "के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांचा उल्लेख असलेले एका मध्यस्थाचा हा व्हॉट्सअॅप चॅट आहे. काशिफ खानची चौकशी का केली जात नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांचे नाते काय? असा प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.

loading image
go to top